Sumiet23

Sunday, 2 October 2011

गं तू नसताना !

सभोवती सर्व असताना
स्मशानीचा एकांत वाटतो
प्रत्येक क्षण विचित्र जातो
गं तू नसताना

विरहाच्या तीव्र वेदनांनी
थरथरतं माझं शरीर
अवस्था होते फार गंभीर
गं तू नसताना

जग होत असता परके
मनासी या मानवेना काही
पळभरही विश्रांती नाही
गं तू नसताना

इवलं पिवलं माझं प्राण
श्वासातून बाहेर निघतं
राणी फक्त तूलाच शोधतं
गं तू नसताना

तुझी वाट बघीतली आहे
गरज तुझी कळली आहे
उजेडातही अंधार आहे
गं तू..... :(

No comments:

Post a Comment

Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)