जे कोणास सांगितले नाही
शोधिले मी शोधिले सर्वाही
खरच..... मला हवय काही
झोंबणारं ऊन्हात एक शीतल छाया
माझे अंतर जाणणारा तो देवराया
स्वार्थाच्या नात्यात आपुलकीतली माया
प्रितीच्या हृदयी माझी निजलेली काया
मनातले विकार शमवणारं
कैक जन्मांची तहान हरणारं
माझ्यातला माणूस जागवणारं
जीवंतपणीच स्वर्गात न्हेणारं
कसा गं सांगू मी हे तुला...
फक्त "तूच" पाहिजे मला !!
No comments:
Post a Comment
Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)