Sumiet23

Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Saturday, 14 February 2015

Valentine..


Sooni sooni thi zindagi.. tha kisi ka to intezaar..
Pata hi nahi chala kab.. suni tumne dil ki pukaar..

Mile hum is tarah se.. jaise koi baat hi nahi..
Par ab tumhare bina.. jaata ek din bhi nahi..

Waise to kai baar tumne.. dil ko mere toda hai..
Fir bhi hamesha dil.. tumhare paas hi ayaa hai..

Bichhde kabhi hum to.. din raat tumhe yaad kiya..
Bhool gaya main sab.. fir tumne utna pyaar diya..

Duniya ko door kar ke.. aaj hum aaye paas..
Ab nibhana pyaar ko.. tum mere jeene ki aas..

Badalo chahe rang dhang.. na badalna chaahat..
Galati meri ho ya tumhari.. par sorry ki ho aadat..

Farak nahi padta.. koi agar kuchh bhi kiye..
Tu zaroori sa hai.. mujhko zinda rehne ke liye..

Kehdo mujhe.. kabhi hum na honge juda..
Tum mile.. toh maine paya.. hai khuda..

You are harsh.. and you are divine..
Oh love of mine.. my dear valentine..





Monday, 19 January 2015

वेड..

वेड हे मला लागले काय सांगू किती गं तुझे..
तुझ्यामुळे जीव जळे माझा अन् तुझ्यामुळेच विझे..

प्रेमाचा माझा अतिरेक तू सहन करशील का ?
रागाने हाथ सुटला माझा तर तू धरशील का ?

जे ठरवलं आहे तेच आता होणार..
काही झाले तरी प्रेम मात्र राहणार..

तू माझं आयुष्य आहेस हे माहीत आहे तुला..
मग तुझ्या मनातली गोष्ट सांगत का नाहीस मला..

बदल जरा आता तू, तरच सुखाने राहू..
नाहीतर लवकरच स्वर्गात एकमेका पाहू..

Sumiet



Tuesday, 25 November 2014

विचार..

आलय वय हे निघून जाणार..
गरज तुझी सम्पून जाणार..
प्रेम खूप आलय तुझ्यावर..
एक दिवस तो ही उडून जाणार..

मला अंधाराची सवय आहे..
तुला रोशनाइची आवड आहे..
किती दिवस तू पळशील..
इथे खोट्यांचे सर्व जाळे आहे..

चार दिवस सुखाचे..
कोण नाही कोणाचे..
कोणी आपले भेटायला..
नशीब लागते जन्माचे..

आज तू हसत आहेस म्हणून..
सर्व आहेत रोज तुझ्यामागून..
अश्रूंची वेळ आल्यावर..
कोण आवरेल तुला माझ्यावाचून..?

सर्व आहे पैसा पाणी..
काय हवय तुला राणी..
कर त्याच्याशी लग्न तू..
फक्त प्रेम नको मागू आणि..

सूर्य जो गेला पुन: येतो..
कर्माचा चक्र गोल फिरतो..
धोखा ज्याने दिला आज..
उद्या त्याचा विश्वासघात होतो..

गेलीस तू जे मला सोडून..
निर्णय घतलेस स्वत:हून..
Thanks बोलतो तुला आता..
चांगली भेटली एक तुझ्याहून..

ती खोट नाही बोलत..
ती मला नाही दुखवत..
माझाच विचार करते ती..
स्वत:चा नाही करत..

तरिही माझ्यावर तूच सवार..
तू का ग घेतलेस माघार..
डोळे बंद करून क्षण काही..
सांग तुला कोणाचा येतो विचार..


सुमीत..


Thursday, 6 November 2014

प्रेम कधी करू नये...

प्रेम कधी करू नये...!!

प्रेम केले तिच्यावर, तिने अस करू नये..
मी हसवले तिला, तिने मला रडवू नये..

तिच्यासाठी जग सोडले, जगासाठी मला सोडू नये..
चूक माझे नसताना काही, तिने शिक्षा ही देउ नये..

लोक काय म्हणतील त्याचा, विचार तिने करू नये..
नाहीतरी मोठ्या शब्दात, "प्रेम केले" अस म्हणू नये..

प्रेमाला खेळ बनवून, कोणी कोणाशी खेळू नये..
प्रसंग माझ्यावर आले, देव कोणावर आणू नये..

वेळ येते प्रत्येकावर, पण साथ देणे सोडू नये..
आधार देउनी पहिल्यांदा, मग निराधार करू नये..

चाळे करताना नाही वाटले जर, तर मान्य करताना वाटू नये..
आतून काही एक असाल तर, बाहेर भलतेच काही दाखवू नये..

नष्ट करूनी दुस-याला, भ्रष्ट स्वत:ला करू नये..
प्रेम एकाशी करूनी, लग्न दूस-याशी करू नये..

प्रेमाला लाथ मारून, मैत्रीच्या फुशका-या मारू नये..
नात तोडायचच असेल तर, नात केव्हा जोडूच नये..

बोलेल एक आणी करेल एक, मनूष्य त्याला म्हणू नये..
फक्त वेदनाच मिळावेत तर, कोणावर प्रेम कधी करू नये..

- सुमीत...


Saturday, 20 September 2014

नाही कलळे कधी..

तुझे मन तूटले ते तुला दिसले..
माझे मन तूटले.. कोणा न कळले..

तू रडलीस तसे माझे पण अश्रू गेले..
पुसून टाकलेस तू.. पण माझे तसेच राहिले..

काय माहीत असे वागून नशीबाला काय भेटले..
सांग ग तू मला.. यात तुझे माझे काय चूकले..

सोडले तुला पण तुझे आठवण जे राहिले..
कळत असूनही पाऊल.. आज हे मागे वळले..

तुझ्या आणि माझ्यात आता काही न उरले..
कधी जागाने तर कधी.. आपणच सर्व सम्पवले..

या भावना काही केल्या आवरता नाही आले..
दूर असणारे चंद्र.. कधी हातात आलेसे वाटले..

दुनीया सोबत असूनहीे मन हे तुझ्याकडे राहीले..
नाही कलळे कधी.. मी तुझ्यात काय पाहीले..

मी तुझ्यात काय पाहीले..

सुमीत...


Thursday, 21 March 2013

पुन्हा जगावसं वाटलं..

आज सकाळी अचानक एक नवल घडलं..
आरश्या समोर उभा राहून मी स्वतःला पाहिलं..
"किती गोड दिसतोस रे तू.." माझ्या मनाने सांगितलं..
तेव्हा कळत नकळत.. मला स्वतःवर प्रेम जडलं..

अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..

लाल लाल ते सूर्य कसं सागरामध्ये शिरलं..
निसर्गाच्या सुगंधासोबत गार वारं पण सुटलं..
आप आपसात पशुपक्ष्यांनी ताल आणि सूर धरलं..
देवाचे हे सैंदर्य पाहून माझं मन हे रमलं..

अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..

गाडी चालवत असताना मी पटकन ब्रेक दाबलं..
ओक्षाबोक्षी रडताना एक मूल मला दिसलं..
कसं बसं करून शेवटी घर त्याचं शोधलं..
पण जाता जाता मात्र मी त्याला हृदयाशी धरलं..

अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..

कोप-यात बसून अश्रु गाळताना मला एकीने पाहिलं..
"का रे ? काय झालं ?" मग तिने मला विचारलं..
"कोणीच नाही गं माझं.." म्हणत माझं हुंदकं वाढलं..
म्हणाली ती डोळे पुसून.. "का ? मला समज ना आपलं.."

अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.

कुटूंब नाही पैसा नाही असं दैव माझं फुटलेलं..
कोणत्यातरी कारणासाठी जगू असं काहीच नाही उरलं..
पण आज inbox मध्ये एक email मी पाहिलं..
नामवंत त्या कंपनीने मला उच्च पदासाठी नेमलं..

अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..

ब-याच वर्षानंतर आज त्याने मला संपर्क साधलं..
बालपणीच्या मित्रासवे मग खूप दंगा ही केलं..
पुन्हा ती शाळा ते घर सारं काही आठवलं..
पटकन त्याने मला माझ्या लग्नाबद्दल wish केलं..

अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.

बोलता बोलता आज मनात एक विचार आलं..
जिने मला जन्म देऊन लहानाचं मोठं केलं..
जे जे काही मी मागितलं ते ते मला दिलं..
काय होणार माझ्या आईचे मी मेल्यानंतर भलं..?

अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.

पडून होतो मी अंधारात कोणीतरी हाथ माझं धरलं..
"पापा.. नका ना मारू मला.." असं हाक मारत राहिलं..
त्या गोड छकुलीला पाहून मन माझं द्रवलं..
लगेच जागा मी झालो स्वप्न माझं भंगलं..

अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.

वाईट या अनुभवांनी मला खूप काही शिकवलं..
कोणास न दिसणारा देव मला माणूसकीत सापडलं..
दुस-यांसाठी काही तरी करावं असं वाटू लागलं..
मरताना मात्र मन नको म्हणायला "काही तरी राहिलं.."

अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं.

जगण्याची ईच्छाच संपली जेव्हापासून मानसीने मला सोडलं..
हृदय दुखतय तेव्हापासून ते आजवर नाही थांबलं..
पण आज अचानक माझ्या मनात हे आलं..
"का जीव देतोस रे ? कोणीतरी आहे तुझ्यासाठी थांबलेलं..
शोध ना जरा तिला जी शोधतेय खरं प्रेम तुझ्यातलं.."

अन् आज मला पुन्हा जगावसं वाटलं..

आणि असच मला आज जगण्याचं एक कारण गावलं..
मानसीचे विसर पडून एकटं राहणं येऊ लागलं..
पण शेवटी तिला दिलेलं वचन मला आठवलं..
"मर जाऊँगा तेरे बिना.." माझच शब्द मला नडलं..
जाऊ दे.. परत पुन्हा एकदा मी मरायचच ठरवलं...!!




                  Sumiet23
This Article was written in the remembrance of Manu..












Yeh pyaar main kyu hota hai.. Yeh pyaar main kyu hota hai..
Kyu kisi ko wafa ke badle wafa nahi milti..
Kyu kisiko duaa ke badle duaa nahi milti..
Kyu kisiko khushi ke badle khushi nahi milti..
Kyu kisiko hasee ke badle hasee nahi milti..
 Yeh pyaar main kyu hota hai.. Yeh pyaar main kyu hota hai..


Friday, 27 April 2012

ती शिरोडकर...



http://www.facebook.com/photo.php?fbid=404584069566009&set=a.249442275080190.70370.249436878414063&type=1&theater

हो.. एक होती शिरोडकर नावाची..|

शाळेत मला खूप आवडायची..||

रोज चोरून चोरून, पहायचो मी तीला..|
पहील्या प्रेमाने, झपाटलं होतं मला..||

हृदय हे माझं, पार धडधडायचं..|
समजत नव्हतं, काय करायचं..||

हसणं तीचं, फुलासारखं होतं..|
बोलणं तीचं, फारच गोड होतं..||

लाजाळूपेक्षा ती, जास्त लाजायची..|
काय सांगू किती, सुंदर दिसायची..||

मला पाहवत नसायचं, तीला रडताना..|
मार खाल्लं बाईचं, सूड तीचं घेताना..||

वर्गातलं ते अभ्यास, सारं डोक्यावरून जायचं..|
तीच्या विचाराने मनात, नेहमी एक प्रश्न यायचं..||

केव्हातरी ती मला लाईन देईल का..?
हालत माझ्या जिवाची कधी ओळखेल का..??

आता तर शाळेत न जाता करमत नव्हतं..|
मन माझं हे तीचा मागोवा घेत होतं..||

खूप मेहनत करून, केली जरा जवळीकता..|
वाट पहायचो तीची, रस्त्यावर येता जाता..||

खूप दिवसांनी एकदा, धीर मी केलं..|
"तू मला खूप आवडतेस", वाटेतच सांगितलं..||

"घरी तुझी मला, खूपच आठवण येते..|

प्लीज रोज आपण, भेटायचं का ईथे..??" ||

गडबडली ती अशी, लाल झाली लज्जेने..|
"छे छे नाही जमायचं", म्हणाली नकाराने..||

गेली ती सरसरत, मला निराश करून..|
माझ्या हालवर मला, असं एकटं सोडून..||

पण तरीही कुठेतरी, ती मला पाहून हसायची..|
"तू पण मला आवडतोस", जणू अशी काही म्हणायची..||

तीला भेटण्याची प्रत्येक संधी, मी नाही सोडायचो..|
तीच्या एका ईशा-यावर, मी वाटेल ते करायचो..||

की फक्त एकदा मला, तिचा हात धरायचं होतं..|
तीला हृदयाशी धरून, जीव शांत करायचं होतं..||

पण हे काय झालं, माझा प्रेमाचा खेळ..|
दूर गेली ती निघून, येता दहावीची वेळ..||

भूकंप झालं, आभाळ कोसळं, गांगरून गेलो..|
तीला गमावलेल्या भितीने, मी खूपच घाबरलो..||

गेली ती दुस-या शहरात, मला रड रड रडवून..|
दमलो मी तर मेलो, आजतागत तिची वाट पाहून..||

पहील्या प्रेमाने माझ्या, मला का तडपवलं..?
काय रे हे देवा, तू असं का केलं..??

कदाचित म्हणूनच माझ्या प्रश्नाचं उत्तर.. केव्हाच तिला देता नाही आलं..|

"गं आपण पुढे काय करायचं"..हा माझा प्रश्न.. एक प्रश्न म्हणूनच राहिलं..!!




Author : Sumiet ( www.sumiet23.blogspot.com )

Like and Share.. जर तुमच्या जिवनात पण एक "शिरोडकर" होती...

Friday, 20 April 2012

तुझा तो स्पर्श......!!

आठवतं मला.. जे घडलं आपल्यात.

आता विचार करावा लागत आहे.. कारण तेव्हा विचार केला नव्हता.
नशा होती ती एक.. ज्याने मन गूंग झालं होतं.
तारूण्य हे असच असतं.. ह्या शरीराला व मनाला बदलून टाकतं.
सर्व काही असूनही काही तरी नाहीये असं वाटतं.
अनेक ईच्छा जागून एक बेचैनी निरमाण होते.

आणी अश्या अवस्थेत तू मला भेटलीस.
जसं कोरड्या जमीनीवर पहीला पाऊस पडतो.
तेव्हा किती गार, किती प्रसन्न, किती मऊ, किती काय वाटतं हे पाऊस शोषणा-या मातीलाच माहीत.
खरच.. तुझं ते होकार, माझ्यासाठी उपकार होतं.
तू माझ्या जिवनात आलीस.. आणी माझं जग बदललं..!

माहीत आहे का तुला..? तुला मिळवण्याकरीता मी किती कष्ट केले ते..?
रात्र रात्र जागून काढली..
जन्मजात लाजाळू असूनही मी तुझ्याशी बोलायला हिंमत बाणली..
क्षणोक्षणी तुझाच विचार केला..
जे काही माझं होतं, ते सारं तुला देण्याचं प्रयत्न केलं..
समाजात मी चांगला होतो ते बद्नाम झालो..
किती सांगू मी काय काय केलं..?
पण ते का केलं.. हे कधी कळलं का तुला..?

प्रेमासाठी गं राणी..! फक्त तुझ्या प्रेमासाठी..!!

होय.. ह्या सा-या गोष्टींसाठी तूनं मला खूप साथ दिली.. पण का..?

माहीत नव्हतं मला की तू प्रेम म्हणजे हवस समजत होतीस.
तुला फक्त शरीर पाहिजे होतं.. मनाशी काही घेणदेणं नव्हतं.
स्वतः लाज सोडून.. तू मला निर्लज्ज बनवलस.
मान्य आहे मला की.. शरीराची मस्ती सर्वांना हवी असते.
पण मग पहायला गेलं तर.. सर्वांचं शरीर एकसारखच असतं.
म्हणून काय मग दिसेल त्या शरीरावर प्रेम करायचं..?
माझं मन, माझं स्वभाव, माझे विचार, हे तुला खास नाही वाटले का..?

तुझ्या वडिलांनी तुला माझ्यापासून लांब रहायला.. माझ्याशी नातं तोडायला.. मला परकं करायला बजावलं.. आणी ते तू ऐकलस.. हेच तुझं प्रेम ना..?
एका फटक्यात तू मला सोडून दिलेस.. काय फरक पडलं तुला..?
हा नाही तर तो.. पोरच पाहिजेत होते ना तुला..?
मिळेल त्या पोराला क्षणार्धात पटवून.. शरीराचे चाळे करायला.. लाज कशी गं वाटली नाही तुला..?

कळलं मला.. मी चूकलो..
सुरुवातीला मलापण तुझं शरीरच पाहीजे होतं..
पण त्या शरीराचं संबंध जोडता जोडता.. मी तुझ्या मनात उतरलो.
शारीरिक प्रेम करता करता.. मानसिक प्रीत कधी जडली हे कळलच नाही.
पण जे काही झालं.. त्याने मी बांधला गेलो.
आता मी तुला मनापासून प्रेम करायला लागलो.
प्रेम म्हणजे हवस नसतं.. हे मला कळून चूकलं.
पण तुझं काय..? का तुला काहीच नाही उमगलं..?

शेवटी काय झालं..? माझच नूकसान झालं ना..?
तुझ्यासाठी तर जाशील तिथे मजनू आहेत.. पण माझ्यासाठी तर तूच एक प्रेमिका होतीस ना..?
मला दुसरी मिळालेली तुला पाहणे अशक्यच आहे.. पण.. पाहिले मी तुला दुस-याची होताना..!

किती वाईट वाटलं.. किती रडलो.. कितींदा मेलो.. तरीही मी जीवंत आहे.. कदाचित कुठेतरी एक आशा आहे.. की तू केव्हातरी मागे वळून पाहशील.. पुन्हा मला आपलं बनवशील..

आणी आज जेव्हा जेव्हा मला.. माझ्या एकटेपणाचा स्पर्श होतो.. तेव्हा तेव्हा मला आठवतो..

तुझा तो स्पर्श......!!

Author : Sumiet ( www.sumiet23.blogspot.com )

Like and Share.. if this Story has made you cry..


Wednesday, 4 April 2012

ती तशीच राहू दे ना मला.. :'(

ती :
°
आता लग्न करावेच लागणार आहे मला कुणाशी तरी..
तशी दोन - चार मुलांची स्थळेही सांगून आली..
°
कोणी बघितलच असशील तर सांग त्याला..
अशी काल आई म्हणाली मला..
°
म्हटलं आता विचारावं तुला, की तू आहेस का तयार..?
अजूनही मी आवडते तुला..? का सोडलास तो विचार..?
°
°
°
(धडाधद धडाधड ती फक्त बोलतच होती..
सुटली तेव्हा अशी की थांबतच नव्हती..)
°
(शांतपणे मी तिचे सारे ऐकून घेतले..
नंतर उगीच माझे मलाच हसू आले..)
°
मी :
°
खेळणं झालं की राणी, तुझं हे असं..
की चॉकलेट खाऊन, कागद फेकतात जसं..
°
तेव्हा आठवतं मला, नाकारलीस जोरात हसून..
म्हणालीस ~ मी पाहिलेच नाही, तुला त्या नजरेतून..
°
दुसरी चांगली मिळेल, मला जा विसरून..
मग थट्टा केलीस माझी, चार चौघींना सांगून..
°
मी मात्र वेडा तुझ्यावर प्रेम करणारा..
झिडकारलेस तरी तुला दुरूनच पाहणारा..
°
त्याग म्हणजेच खरं प्रेम, असं सगळ्यांकडून ऐकणारा..
सुखी रहा ~ असं म्हणत, तुझे सुख पाहणारा..
°
का वागलीस तेव्हा अशी, मला माहित नाही..
काय आता मनात तुझ्या, काही कळत नाही..
°
काय हवय गं मला, मलाच उमजत नाही..
बायको झालीस तरी, तुला प्रेम समजणार नाही..
°
लग्न करायचेच आहे कुणाशी तरी.. मग कोणीही भेटेल गं तुला..
पण मी जिच्यावर प्रेम केलं.. ती तशीच राहू दे ना मला..

:'(

(¯`v´¯)
.`•.¸.•´

<3 $ <3

Like & Share.. if this conversation have made your Eyes shed Tears.

Thursday, 29 March 2012

समाधी...

प्रेम केलं मी तुझ्यावर.. मला केव्हा डावलू नकोस..|
खूप हसवलं मी तुला.. मला केव्हा रडवू नकोस..||

सर्व सोडलं मी तुझ्यासाठी.. मला केव्हा सोडू नकोस..|
माझं आयुष्य असं बदलून.. तू केव्हा बदलू नकोस..||

जरी चूक झाली कुठे.. तरी केव्हा रागवू नकोस..|
तू सांगशील ते करीन.. पण मला दुखवू नकोस..||

जेव्हा कोणी नसेल माझं.. तेव्हा परकं करू नकोस..|
माझ्यावर संकट काही येता.. पळ केव्हा काढू नकोस..||

विश्वास केव्हा तुटलं तरी.. नातं तू तोडू नकोस..|
सर्व काही सांगीन मी.. मात्र ऐकायला भीऊ नकोस..||

चांगले तर खूप आहेत जगात.. पण मला बेकार म्हणू नकोस..|
मला स्वतःची लाज वाटेल.. असं केव्हा वागू नकोस..||

सर्व दिलं मी तुला.. आता जीव मागू नकोस..|
याच शरीराने मला.. नरकात कधी पाठवू नकोस..||

तू फक्त "हो" म्हण.. "नाही" केव्हा म्हणू नकोस..|
फक्त तुझं हृदय पाहिजे.. द्यायला मागे येऊ नकोस..||

सर्व माहीत असून.. मारली उडी प्रेमाच्या खड्ड्यात..|
जरी खड्ड्यात पुरलेस मला..तरी त्यावर मात्र.. माझी समाधी बांधायला विसरू नकोस........!! <3

Like & Share.. if you found this Article a Senti one..

Author : Sumiet (www.sumiet23.blogspot.com)

Wednesday, 28 March 2012

Awesome Proposal...!!

HE : Hmm.. say who am I..? :)

SHE : Huh..?
Means..?

HE : Who am I of yours..?

SHE : Obviously yaar.. You are my Friend.. :)

HE : I don't wanna be friend.. :(

SHE : Why..?
What happened Dear..?

HE : Cause, there's always an "end" in it.. (fri + end) :©

SHE : Awww...
So you wanna be my Lover ha..? ;)

HE : No.. :-|

SHE : No..?
Now what..??

HE : There's always an "over" in it.. (l + over) :-|

SHE : Uff.. yaar.. :-|
So.. who you wanna be..?

HE : I wanna be a Member of your Family.. :)

SHE : ?????

HE : Cause, there's always "ILY" in it..
(fam + ily)
And.. I Love You.. :)

<3 S <3

Like & Share / Tag.. if you think that this Proposal was Awesome..

Monday, 26 March 2012

येणारी ती..

ती : वचन देशील का..?
की तू दुस-या कोणत्या मुलीवर प्रेम करणार नाहीस..
तो : वचन देणे शक्य नाही..:-|
ती : हे बघ.. मी मस्करीच्या mood मध्ये नाहीये.. :(
तो : मस्करी नाहीये गं..
त्याला कदाचित एक कारण आहे..
ती : म्हणजे दुसरी कोणी तरी आहे.. :©
तो : होय.. :-|
ती : जा नालायका..
आज पासून भेटायचं नाही मला.. :@
तो : अगं ती अजून यायची आहे माझ्या जिवनात..
आणी त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल..
ती : What the Hell do you mean..?
कोण आहे ती..?
तो : तुझ्यासारखीच सुंदर दिसणारी.. जी माझ्यासाठी येईल..
आणी जी तूला Mumma म्हणेल.. ♥ :)
♥ Sumiet ♥
Like & Share.. if this Canvass was Sweet..

Wednesday, 7 March 2012

Sweet Love

तो : एक सांग ना..
 तू खरच का प्रेम करतेस माझ्यावर..?

ती : उफ्फ्..
केव्हा तरी माझ्या नजरेला नजर मिळवत जा..

तो : किती गं भेटायचं असं चोरून..?

ती : अरे.. नेहमी जरा धीर धरायला शिकत जा..

तो : माझा हा एकटेपणा मला खातो.. काय करू..?

ती : अश्या वेळी..
माझ्या आठवणीत जरा रमत जा..

तो : रोज मी असा किती रडू तुझ्यासाठी..?

ती : मला हसवण्यासाठी म्हणून.. जरा हसत जा..

तो : हल्ली तू अशी काय करतेस..?
असतेस तरी कुठे..?

ती : इथे तिथे मला शोधण्यापूर्वी.. तुझ्या मनाला विचारत जा..

तो : अशी कशी तुझ्या प्रेमाची रीत..?

ती : काही तरी अजब करण्याची तयारी ठेवत जा..

तो : Please राणी..
एकदा तरी तू माझ्या जवळ येशील का..?

ती : प्रेम हे खेळ नसतं रे..
राजा.. परिक्षेत असाच उतरत जा..

<3 Love you Forever <3

Friday, 2 March 2012

Please Please Please...


Please Please Please...

असं पाहू नकोस.. मला हरवायला होतं..|
सभोवतलीचं हे जग.. मला दिसेनासं होतं..||

असं बोलू नकोस माझ्याशी.. ऐकत रहावसं वाटतं..|
जे बोलायचं आहे मला.. नेमकं विसरायला होतं..||

अशी मस्करी करू नकोस.. मला रडायला येतं..|
तुझं प्रेम खोटं नाही ना..? असं वाटायला लागतं..||

असं ऐकू नकोस माझं.. मन हे भरून येतं..|
जे नाही सांगितलं केव्हा.. तुला सांगावसं वाटतं..||

अशी आठवण काढू नकोस.. जगणं कठीण होतं..|
खरं तुला कुठेतरी दूर.. घेऊन जावसं वाटतं..||

असं स्वप्न दाखवू नकोस.. मला जगावसं वाटतं..|
वाढत्या या वयोमानाचं.. भय वाटायला लागतं..||

असं केव्हा रडू नकोस.. माझं जीव रे जातं..|
तुझ्या सर्व सुखासाठी.. मर्यादा ओलांडावसं वाटतं..||

असं जवळ येऊ नकोस.. हृदय धडधडायला लागतं..|
सरळ तुला ओढून.. हृदयाशी धरावसं वाटतं..||

असं सारखं भेटू नकोस.. मला काहीतरी होतं..|
जसं मी प्रेमात पडलो.. तुलाही पाडावसं वाटतं..||

आता आलीच आहेस माझ्या जिवनात.. तर केव्हा सोडून जाऊ नकोस..|


खरच.. मनात असं विचार येता.. तुला मारून.. मला मरावसं वाटतं..||

♥ S ♥

Like & Share / Tag.. if you feel the same..

Wednesday, 4 January 2012

ये ना परत..

माहीत होतं मला की तुझं व्यसन लागेल.. तरीही लावून घेतलं.

आठवतात ते दिवस.. मी किती खुशनसीब होतो.
या मनाला व शरीराला एक आधार मिळालं होतं.. आणी काय पाहिजे ?

तुझं अंगन् अंग पहायचो..
तुझं हृदय-स्पंदनं ऐकायचो..
तुझी मधुरता चाखायचो..
श्वासात तुझं सुगंध भरायचो..
तुझं ते स्पर्श आनुभवायचो..
दिनरात तुझ्याच विश्वात वावरायचो..
जणू ते एक प्रकारचं स्वर्गच होतं.. ज्यात मी जगायचो.

तू होतीस.. स्वर्ग होतं..
पण..

आता जगणं कठीण झालं आहे.. या नरकात.

मी "माझं" इथे कोणाला म्हणू ?
खूप शोधतोय.. खूप रडतोय.. प्रयत्नांनी दमतोय..
पण तुझ्यासारखी तूच.. अन्य कोणीच नाही.
जे तूनं केलं.. कोणालाच करता नाही आलं.

माहीत आहे.. मी चूकलो..
वेळेतच तुझं महत्व नाही जाणलं.
पण कसाही असलो तरी शेवटी मी तुझाच आहे ना ?
तुझ्यासाठी पुष्कळ असतील.. पण माझ्यासाठी तर तूच आहेस ना ?

शेवटी हा जीव जाईल.. या मुखात एकच वाक्य राहिल..

Please.. ये ना परत.. :'(

Friday, 2 December 2011

नजर....

चिड यायची मला.. मुलींना पाहून !

पाहिले होते मी त्यांना.. त्यांचे विचार, स्वभाव, वर्तन..
किती Over Smart, Self Obsessed, Weird, Criticizing असतात ते..
आज दुनियेतली 75 % पाप त्यांच्यामुळेच घडतात.
सभ्य मुलांना तेच तर बद्नाम करतात.. नाही का ?

मित्र मला म्हणायचे.. "कधितरी प्रेमाशी नजरा नजर होईल..!"
मी म्हणायचो.. "No ways.. Pyar impossible..!"

पण एक दिवस..

'तिला' मी पाहिले.. आणी तिनेही 'मला'..!

आयुष्यात पहिल्यांदाच मी एका मुलीच्या नजरेला पाहत होतो..

तिच्या त्या दृष्टीत काय होते कोणास ठाऊक..?
पण कधी नव्हते तसे हृदय धडधडले.. अंग थरथरले.. श्वास गरगरले.. आग भडभडले..
माझ्या नजरेतली कोणतीही मुलगी अशी केव्हाच नव्हती.. नाही अशी नजर !

तिने मला बदलले..

आता तर सर्व मुलींमध्ये तीच दिसू लागली !
ध्यानी मनी स्वप्नी.. तीच भरली..
स्वतःकडे ओढू लागली..
जगातल्या ईतर मुलींपेक्षा.. ही खरोखर वेगळीच होती..!

आजतागत माझ्या या नजरेत भरून राहिली आहे.. तिची ती..

"नजर"..!

Tuesday, 29 November 2011

वेडं केलस...!

वेड लावलं होतं मी तिला... अगदी वेड्यांसारखं !

माझ्याशिवाय तिला क्षणभरही करमत नव्हतं.
भाऊ-बहीण, नाती-गोती, मित्र-मंडळी तर दूरच... पण आई-वडीलही तिला नकोसे झाले होते.
किंबहुना तिला हे सारे माझ्यातच दिसायचे.
स्वतःचे 'सर्वस्व'... तीनं माझ्या हातात देऊन ठेवलं होतं !

आता 'ती' आणी 'मी' हा भेद उरलाच नव्हता.
'चोवीस तास' ते 'बारा महिने' आणी 'आहे' ते 'आहेपर्यंत'... हे असेच रहावे अशी माझी एकच ईच्छा होती.
पण.....

म्हणतात ना...

" 'वेळ' ही परिवर्तनशील आहे " !

'भविष्य' म्हणून मी जे पाहत होतो... तेच 'भूतकाळात' हरवलं !
वर्तमानातून ती निघून गेली... तिथेच जग बदललं !
कारण कदाचित... मी फक्त 'तिला' पाहत होतो... ती 'परिस्थितीला'.

आता माझं 'सर्वस्व' तिच्या हातात गेलं.
आज जेव्हा जेव्हा मी तिला आनंदात पाहतो... ते ही मला सोडून जगाबरोबर...
तेव्हा तेव्हा मनात एकच म्हणतो...

" अगदी पुरेपूर सूड घेतलस...
जश्यास तसं मला...

'वेडं केलस'...!"

:'(

Tuesday, 8 November 2011

बद्नाम....!

'मी' आणी 'ती' यांना मी जर 'लोकांच्या' नजरेने पाहिले असते तर....?
जे मला आज कळत आहे ते कालच कळून चूकले असते तर....?

असे विचार माझ्या मनात नेहमी येतात.

हे खरे आहे, कोणी तुमचं नातं तपासणार नाहीत.
तुमचे विचार समजणार नाहीत.
तुमचं उद्देश ओळखणार नाहीत.
तुमचं वर्तन पाहणार नाहीत.

फक्त पाहीलं जातं, एक 'मुलगा'... एक 'मुलगी'... आणी त्यांची 'संगत' !
अर्थाचा अनर्थ लावणे ही जगाची रीतच आहे, पण त्याला पाठिंबा म्हणजे....

तिच्याविणा माझा एक क्षणही जात नसायचा.
तिच्याशिवाय जिभेवरही काहीच नसायचं.
तिच्याव्यतिरीक्त मला कोणीच नको असायचं.
कोण काय म्हणेल याची पर्वा नसायची.
कधी वाटलं नव्हतं... माझी 'प्रिती' ही 'विकृती' म्हणून ठरेल !

"वादळापूर्वीची शांतता"... असं अगदी बरोबर म्हटलं आहे !
पण या शांततेतही एकाची सूचना माझ्या कानी रोज पडायची.
ते शब्द आजही माझ्या कानात घूमतात...!

"एक दिवस तीच्यामुळे होशील तू... 'बद्नाम' !"

Thursday, 3 November 2011

मरण का आले....?

येणा-या काळाने, मला काही ना दिले |
द्यायच्या पूर्वीच, हिस्कावूनी घेतले ||

वैरींची प्रगती, डोळ्यांना दाखविले |
घडो नये वाटले, तेच घडविले ||

प्रत्येक प्रयत्न, निष्फळ ठरविले |
स्वप्नातही शिरून, सुख नष्ट केले ||

प्रेमाच्या नात्यात, तिरस्कार आणले |
मला माझे म्हणाया, कोणी ना ठेवले ||

कोणी तरी सांगा.....
मी काय पाप केले ?
नीतिने वागूनही.....
अन्याय का झाले ?
जगण्यात या माझ्या.....
मरण का आले ?

Sunday, 2 October 2011

गं तू नसताना !

सभोवती सर्व असताना
स्मशानीचा एकांत वाटतो
प्रत्येक क्षण विचित्र जातो
गं तू नसताना

विरहाच्या तीव्र वेदनांनी
थरथरतं माझं शरीर
अवस्था होते फार गंभीर
गं तू नसताना

जग होत असता परके
मनासी या मानवेना काही
पळभरही विश्रांती नाही
गं तू नसताना

इवलं पिवलं माझं प्राण
श्वासातून बाहेर निघतं
राणी फक्त तूलाच शोधतं
गं तू नसताना

तुझी वाट बघीतली आहे
गरज तुझी कळली आहे
उजेडातही अंधार आहे
गं तू..... :(