Sumiet23

Tuesday, 25 November 2014

विचार..

आलय वय हे निघून जाणार..
गरज तुझी सम्पून जाणार..
प्रेम खूप आलय तुझ्यावर..
एक दिवस तो ही उडून जाणार..

मला अंधाराची सवय आहे..
तुला रोशनाइची आवड आहे..
किती दिवस तू पळशील..
इथे खोट्यांचे सर्व जाळे आहे..

चार दिवस सुखाचे..
कोण नाही कोणाचे..
कोणी आपले भेटायला..
नशीब लागते जन्माचे..

आज तू हसत आहेस म्हणून..
सर्व आहेत रोज तुझ्यामागून..
अश्रूंची वेळ आल्यावर..
कोण आवरेल तुला माझ्यावाचून..?

सर्व आहे पैसा पाणी..
काय हवय तुला राणी..
कर त्याच्याशी लग्न तू..
फक्त प्रेम नको मागू आणि..

सूर्य जो गेला पुन: येतो..
कर्माचा चक्र गोल फिरतो..
धोखा ज्याने दिला आज..
उद्या त्याचा विश्वासघात होतो..

गेलीस तू जे मला सोडून..
निर्णय घतलेस स्वत:हून..
Thanks बोलतो तुला आता..
चांगली भेटली एक तुझ्याहून..

ती खोट नाही बोलत..
ती मला नाही दुखवत..
माझाच विचार करते ती..
स्वत:चा नाही करत..

तरिही माझ्यावर तूच सवार..
तू का ग घेतलेस माघार..
डोळे बंद करून क्षण काही..
सांग तुला कोणाचा येतो विचार..


सुमीत..


No comments:

Post a Comment

Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)