Sumiet23

Thursday, 6 November 2014

प्रेम कधी करू नये...

प्रेम कधी करू नये...!!

प्रेम केले तिच्यावर, तिने अस करू नये..
मी हसवले तिला, तिने मला रडवू नये..

तिच्यासाठी जग सोडले, जगासाठी मला सोडू नये..
चूक माझे नसताना काही, तिने शिक्षा ही देउ नये..

लोक काय म्हणतील त्याचा, विचार तिने करू नये..
नाहीतरी मोठ्या शब्दात, "प्रेम केले" अस म्हणू नये..

प्रेमाला खेळ बनवून, कोणी कोणाशी खेळू नये..
प्रसंग माझ्यावर आले, देव कोणावर आणू नये..

वेळ येते प्रत्येकावर, पण साथ देणे सोडू नये..
आधार देउनी पहिल्यांदा, मग निराधार करू नये..

चाळे करताना नाही वाटले जर, तर मान्य करताना वाटू नये..
आतून काही एक असाल तर, बाहेर भलतेच काही दाखवू नये..

नष्ट करूनी दुस-याला, भ्रष्ट स्वत:ला करू नये..
प्रेम एकाशी करूनी, लग्न दूस-याशी करू नये..

प्रेमाला लाथ मारून, मैत्रीच्या फुशका-या मारू नये..
नात तोडायचच असेल तर, नात केव्हा जोडूच नये..

बोलेल एक आणी करेल एक, मनूष्य त्याला म्हणू नये..
फक्त वेदनाच मिळावेत तर, कोणावर प्रेम कधी करू नये..

- सुमीत...


No comments:

Post a Comment

Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)