हो.. एक होती शिरोडकर नावाची..|
शाळेत मला खूप आवडायची..||रोज चोरून चोरून, पहायचो मी तीला..|
पहील्या प्रेमाने, झपाटलं होतं मला..||
हृदय हे माझं, पार धडधडायचं..|
समजत नव्हतं, काय करायचं..||
हसणं तीचं, फुलासारखं होतं..|
बोलणं तीचं, फारच गोड होतं..||
लाजाळूपेक्षा ती, जास्त लाजायची..|
काय सांगू किती, सुंदर दिसायची..||
मला पाहवत नसायचं, तीला रडताना..|
मार खाल्लं बाईचं, सूड तीचं घेताना..||
वर्गातलं ते अभ्यास, सारं डोक्यावरून जायचं..|
तीच्या विचाराने मनात, नेहमी एक प्रश्न यायचं..||
केव्हातरी ती मला लाईन देईल का..?
हालत माझ्या जिवाची कधी ओळखेल का..??
आता तर शाळेत न जाता करमत नव्हतं..|
मन माझं हे तीचा मागोवा घेत होतं..||
खूप मेहनत करून, केली जरा जवळीकता..|
वाट पहायचो तीची, रस्त्यावर येता जाता..||
खूप दिवसांनी एकदा, धीर मी केलं..|
"तू मला खूप आवडतेस", वाटेतच सांगितलं..||
"घरी तुझी मला, खूपच आठवण येते..|
प्लीज रोज आपण, भेटायचं का ईथे..??" ||
गडबडली ती अशी, लाल झाली लज्जेने..|
"छे छे नाही जमायचं", म्हणाली नकाराने..||
गेली ती सरसरत, मला निराश करून..|
माझ्या हालवर मला, असं एकटं सोडून..||
पण तरीही कुठेतरी, ती मला पाहून हसायची..|
"तू पण मला आवडतोस", जणू अशी काही म्हणायची..||
तीला भेटण्याची प्रत्येक संधी, मी नाही सोडायचो..|
तीच्या एका ईशा-यावर, मी वाटेल ते करायचो..||
की फक्त एकदा मला, तिचा हात धरायचं होतं..|
तीला हृदयाशी धरून, जीव शांत करायचं होतं..||
पण हे काय झालं, माझा प्रेमाचा खेळ..|
दूर गेली ती निघून, येता दहावीची वेळ..||
भूकंप झालं, आभाळ कोसळं, गांगरून गेलो..|
तीला गमावलेल्या भितीने, मी खूपच घाबरलो..||
गेली ती दुस-या शहरात, मला रड रड रडवून..|
दमलो मी तर मेलो, आजतागत तिची वाट पाहून..||
पहील्या प्रेमाने माझ्या, मला का तडपवलं..?
काय रे हे देवा, तू असं का केलं..??
कदाचित म्हणूनच माझ्या प्रश्नाचं उत्तर.. केव्हाच तिला देता नाही आलं..|
"गं आपण पुढे काय करायचं"..हा माझा प्रश्न.. एक प्रश्न म्हणूनच राहिलं..!!
♥
Author : Sumiet ( www.sumiet23.blogspot.com )
Like and Share.. जर तुमच्या जिवनात पण एक "शिरोडकर" होती...
Gud one sumiet ! Is it you ? If yes then I dnt believe u can write these beautiful lines !
ReplyDeleteBut please.. don't hack my blog ha...
DeletePlease i beg you.. :-(