आठवतं मला.. जे घडलं आपल्यात.
आता विचार करावा लागत आहे.. कारण तेव्हा विचार केला नव्हता.नशा होती ती एक.. ज्याने मन गूंग झालं होतं.
तारूण्य हे असच असतं.. ह्या शरीराला व मनाला बदलून टाकतं.
सर्व काही असूनही काही तरी नाहीये असं वाटतं.
अनेक ईच्छा जागून एक बेचैनी निरमाण होते.
आणी अश्या अवस्थेत तू मला भेटलीस.
जसं कोरड्या जमीनीवर पहीला पाऊस पडतो.
तेव्हा किती गार, किती प्रसन्न, किती मऊ, किती काय वाटतं हे पाऊस शोषणा-या मातीलाच माहीत.
खरच.. तुझं ते होकार, माझ्यासाठी उपकार होतं.
तू माझ्या जिवनात आलीस.. आणी माझं जग बदललं..!
माहीत आहे का तुला..? तुला मिळवण्याकरीता मी किती कष्ट केले ते..?
रात्र रात्र जागून काढली..
जन्मजात लाजाळू असूनही मी तुझ्याशी बोलायला हिंमत बाणली..
क्षणोक्षणी तुझाच विचार केला..
जे काही माझं होतं, ते सारं तुला देण्याचं प्रयत्न केलं..
समाजात मी चांगला होतो ते बद्नाम झालो..
किती सांगू मी काय काय केलं..?
पण ते का केलं.. हे कधी कळलं का तुला..?
प्रेमासाठी गं राणी..! फक्त तुझ्या प्रेमासाठी..!!
होय.. ह्या सा-या गोष्टींसाठी तूनं मला खूप साथ दिली.. पण का..?
माहीत नव्हतं मला की तू प्रेम म्हणजे हवस समजत होतीस.
तुला फक्त शरीर पाहिजे होतं.. मनाशी काही घेणदेणं नव्हतं.
स्वतः लाज सोडून.. तू मला निर्लज्ज बनवलस.
मान्य आहे मला की.. शरीराची मस्ती सर्वांना हवी असते.
पण मग पहायला गेलं तर.. सर्वांचं शरीर एकसारखच असतं.
म्हणून काय मग दिसेल त्या शरीरावर प्रेम करायचं..?
माझं मन, माझं स्वभाव, माझे विचार, हे तुला खास नाही वाटले का..?
तुझ्या वडिलांनी तुला माझ्यापासून लांब रहायला.. माझ्याशी नातं तोडायला.. मला परकं करायला बजावलं.. आणी ते तू ऐकलस.. हेच तुझं प्रेम ना..?
एका फटक्यात तू मला सोडून दिलेस.. काय फरक पडलं तुला..?
हा नाही तर तो.. पोरच पाहिजेत होते ना तुला..?
मिळेल त्या पोराला क्षणार्धात पटवून.. शरीराचे चाळे करायला.. लाज कशी गं वाटली नाही तुला..?
कळलं मला.. मी चूकलो..
सुरुवातीला मलापण तुझं शरीरच पाहीजे होतं..
पण त्या शरीराचं संबंध जोडता जोडता.. मी तुझ्या मनात उतरलो.
शारीरिक प्रेम करता करता.. मानसिक प्रीत कधी जडली हे कळलच नाही.
पण जे काही झालं.. त्याने मी बांधला गेलो.
आता मी तुला मनापासून प्रेम करायला लागलो.
प्रेम म्हणजे हवस नसतं.. हे मला कळून चूकलं.
पण तुझं काय..? का तुला काहीच नाही उमगलं..?
शेवटी काय झालं..? माझच नूकसान झालं ना..?
तुझ्यासाठी तर जाशील तिथे मजनू आहेत.. पण माझ्यासाठी तर तूच एक प्रेमिका होतीस ना..?
मला दुसरी मिळालेली तुला पाहणे अशक्यच आहे.. पण.. पाहिले मी तुला दुस-याची होताना..!
किती वाईट वाटलं.. किती रडलो.. कितींदा मेलो.. तरीही मी जीवंत आहे.. कदाचित कुठेतरी एक आशा आहे.. की तू केव्हातरी मागे वळून पाहशील.. पुन्हा मला आपलं बनवशील..
आणी आज जेव्हा जेव्हा मला.. माझ्या एकटेपणाचा स्पर्श होतो.. तेव्हा तेव्हा मला आठवतो..
तुझा तो स्पर्श......!!
Author : Sumiet ( www.sumiet23.blogspot.com )
Like and Share.. if this Story has made you cry..
No comments:
Post a Comment
Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)