ती :
°
आता लग्न करावेच लागणार आहे मला कुणाशी तरी..
तशी दोन - चार मुलांची स्थळेही सांगून आली..
°
कोणी बघितलच असशील तर सांग त्याला..
अशी काल आई म्हणाली मला..
°
म्हटलं आता विचारावं तुला, की तू आहेस का तयार..?
अजूनही मी आवडते तुला..? का सोडलास तो विचार..?
°
°
°
(धडाधद धडाधड ती फक्त बोलतच होती..
सुटली तेव्हा अशी की थांबतच नव्हती..)
°
(शांतपणे मी तिचे सारे ऐकून घेतले..
नंतर उगीच माझे मलाच हसू आले..)
°
मी :
°
खेळणं झालं की राणी, तुझं हे असं..
की चॉकलेट खाऊन, कागद फेकतात जसं..
°
तेव्हा आठवतं मला, नाकारलीस जोरात हसून..
म्हणालीस ~ मी पाहिलेच नाही, तुला त्या नजरेतून..
°
दुसरी चांगली मिळेल, मला जा विसरून..
मग थट्टा केलीस माझी, चार चौघींना सांगून..
°
मी मात्र वेडा तुझ्यावर प्रेम करणारा..
झिडकारलेस तरी तुला दुरूनच पाहणारा..
°
त्याग म्हणजेच खरं प्रेम, असं सगळ्यांकडून ऐकणारा..
सुखी रहा ~ असं म्हणत, तुझे सुख पाहणारा..
°
का वागलीस तेव्हा अशी, मला माहित नाही..
काय आता मनात तुझ्या, काही कळत नाही..
°
काय हवय गं मला, मलाच उमजत नाही..
बायको झालीस तरी, तुला प्रेम समजणार नाही..
°
लग्न करायचेच आहे कुणाशी तरी.. मग कोणीही भेटेल गं तुला..
पण मी जिच्यावर प्रेम केलं.. ती तशीच राहू दे ना मला..
:'(
(¯`v´¯)
.`•.¸.•´
<3 $ <3
Like & Share.. if this conversation have made your Eyes shed Tears.
No comments:
Post a Comment
Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)