Sumiet23

Thursday, 29 March 2012

समाधी...

प्रेम केलं मी तुझ्यावर.. मला केव्हा डावलू नकोस..|
खूप हसवलं मी तुला.. मला केव्हा रडवू नकोस..||

सर्व सोडलं मी तुझ्यासाठी.. मला केव्हा सोडू नकोस..|
माझं आयुष्य असं बदलून.. तू केव्हा बदलू नकोस..||

जरी चूक झाली कुठे.. तरी केव्हा रागवू नकोस..|
तू सांगशील ते करीन.. पण मला दुखवू नकोस..||

जेव्हा कोणी नसेल माझं.. तेव्हा परकं करू नकोस..|
माझ्यावर संकट काही येता.. पळ केव्हा काढू नकोस..||

विश्वास केव्हा तुटलं तरी.. नातं तू तोडू नकोस..|
सर्व काही सांगीन मी.. मात्र ऐकायला भीऊ नकोस..||

चांगले तर खूप आहेत जगात.. पण मला बेकार म्हणू नकोस..|
मला स्वतःची लाज वाटेल.. असं केव्हा वागू नकोस..||

सर्व दिलं मी तुला.. आता जीव मागू नकोस..|
याच शरीराने मला.. नरकात कधी पाठवू नकोस..||

तू फक्त "हो" म्हण.. "नाही" केव्हा म्हणू नकोस..|
फक्त तुझं हृदय पाहिजे.. द्यायला मागे येऊ नकोस..||

सर्व माहीत असून.. मारली उडी प्रेमाच्या खड्ड्यात..|
जरी खड्ड्यात पुरलेस मला..तरी त्यावर मात्र.. माझी समाधी बांधायला विसरू नकोस........!! <3

Like & Share.. if you found this Article a Senti one..

Author : Sumiet (www.sumiet23.blogspot.com)

No comments:

Post a Comment

Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)