Please Please Please...
असं पाहू नकोस.. मला हरवायला होतं..|
सभोवतलीचं हे जग.. मला दिसेनासं होतं..||
असं बोलू नकोस माझ्याशी.. ऐकत रहावसं वाटतं..|
जे बोलायचं आहे मला.. नेमकं विसरायला होतं..||
अशी मस्करी करू नकोस.. मला रडायला येतं..|
तुझं प्रेम खोटं नाही ना..? असं वाटायला लागतं..||
असं ऐकू नकोस माझं.. मन हे भरून येतं..|
जे नाही सांगितलं केव्हा.. तुला सांगावसं वाटतं..||
अशी आठवण काढू नकोस.. जगणं कठीण होतं..|
खरं तुला कुठेतरी दूर.. घेऊन जावसं वाटतं..||
असं स्वप्न दाखवू नकोस.. मला जगावसं वाटतं..|
वाढत्या या वयोमानाचं.. भय वाटायला लागतं..||
असं केव्हा रडू नकोस.. माझं जीव रे जातं..|
तुझ्या सर्व सुखासाठी.. मर्यादा ओलांडावसं वाटतं..||
असं जवळ येऊ नकोस.. हृदय धडधडायला लागतं..|
सरळ तुला ओढून.. हृदयाशी धरावसं वाटतं..||
असं सारखं भेटू नकोस.. मला काहीतरी होतं..|
जसं मी प्रेमात पडलो.. तुलाही पाडावसं वाटतं..||
आता आलीच आहेस माझ्या जिवनात.. तर केव्हा सोडून जाऊ नकोस..|
खरच.. मनात असं विचार येता.. तुला मारून.. मला मरावसं वाटतं..||
♥ S ♥
Like & Share / Tag.. if you feel the same..
No comments:
Post a Comment
Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)