Sumiet23

Wednesday, 7 March 2012

Sweet Love

तो : एक सांग ना..
 तू खरच का प्रेम करतेस माझ्यावर..?

ती : उफ्फ्..
केव्हा तरी माझ्या नजरेला नजर मिळवत जा..

तो : किती गं भेटायचं असं चोरून..?

ती : अरे.. नेहमी जरा धीर धरायला शिकत जा..

तो : माझा हा एकटेपणा मला खातो.. काय करू..?

ती : अश्या वेळी..
माझ्या आठवणीत जरा रमत जा..

तो : रोज मी असा किती रडू तुझ्यासाठी..?

ती : मला हसवण्यासाठी म्हणून.. जरा हसत जा..

तो : हल्ली तू अशी काय करतेस..?
असतेस तरी कुठे..?

ती : इथे तिथे मला शोधण्यापूर्वी.. तुझ्या मनाला विचारत जा..

तो : अशी कशी तुझ्या प्रेमाची रीत..?

ती : काही तरी अजब करण्याची तयारी ठेवत जा..

तो : Please राणी..
एकदा तरी तू माझ्या जवळ येशील का..?

ती : प्रेम हे खेळ नसतं रे..
राजा.. परिक्षेत असाच उतरत जा..

<3 Love you Forever <3

No comments:

Post a Comment

Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)