Sumiet23

Tuesday, 29 November 2011

वेडं केलस...!

वेड लावलं होतं मी तिला... अगदी वेड्यांसारखं !

माझ्याशिवाय तिला क्षणभरही करमत नव्हतं.
भाऊ-बहीण, नाती-गोती, मित्र-मंडळी तर दूरच... पण आई-वडीलही तिला नकोसे झाले होते.
किंबहुना तिला हे सारे माझ्यातच दिसायचे.
स्वतःचे 'सर्वस्व'... तीनं माझ्या हातात देऊन ठेवलं होतं !

आता 'ती' आणी 'मी' हा भेद उरलाच नव्हता.
'चोवीस तास' ते 'बारा महिने' आणी 'आहे' ते 'आहेपर्यंत'... हे असेच रहावे अशी माझी एकच ईच्छा होती.
पण.....

म्हणतात ना...

" 'वेळ' ही परिवर्तनशील आहे " !

'भविष्य' म्हणून मी जे पाहत होतो... तेच 'भूतकाळात' हरवलं !
वर्तमानातून ती निघून गेली... तिथेच जग बदललं !
कारण कदाचित... मी फक्त 'तिला' पाहत होतो... ती 'परिस्थितीला'.

आता माझं 'सर्वस्व' तिच्या हातात गेलं.
आज जेव्हा जेव्हा मी तिला आनंदात पाहतो... ते ही मला सोडून जगाबरोबर...
तेव्हा तेव्हा मनात एकच म्हणतो...

" अगदी पुरेपूर सूड घेतलस...
जश्यास तसं मला...

'वेडं केलस'...!"

:'(

No comments:

Post a Comment

Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)