Sumiet23

Tuesday, 8 November 2011

बद्नाम....!

'मी' आणी 'ती' यांना मी जर 'लोकांच्या' नजरेने पाहिले असते तर....?
जे मला आज कळत आहे ते कालच कळून चूकले असते तर....?

असे विचार माझ्या मनात नेहमी येतात.

हे खरे आहे, कोणी तुमचं नातं तपासणार नाहीत.
तुमचे विचार समजणार नाहीत.
तुमचं उद्देश ओळखणार नाहीत.
तुमचं वर्तन पाहणार नाहीत.

फक्त पाहीलं जातं, एक 'मुलगा'... एक 'मुलगी'... आणी त्यांची 'संगत' !
अर्थाचा अनर्थ लावणे ही जगाची रीतच आहे, पण त्याला पाठिंबा म्हणजे....

तिच्याविणा माझा एक क्षणही जात नसायचा.
तिच्याशिवाय जिभेवरही काहीच नसायचं.
तिच्याव्यतिरीक्त मला कोणीच नको असायचं.
कोण काय म्हणेल याची पर्वा नसायची.
कधी वाटलं नव्हतं... माझी 'प्रिती' ही 'विकृती' म्हणून ठरेल !

"वादळापूर्वीची शांतता"... असं अगदी बरोबर म्हटलं आहे !
पण या शांततेतही एकाची सूचना माझ्या कानी रोज पडायची.
ते शब्द आजही माझ्या कानात घूमतात...!

"एक दिवस तीच्यामुळे होशील तू... 'बद्नाम' !"

No comments:

Post a Comment

Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)