Sumiet23

Thursday, 3 November 2011

मरण का आले....?

येणा-या काळाने, मला काही ना दिले |
द्यायच्या पूर्वीच, हिस्कावूनी घेतले ||

वैरींची प्रगती, डोळ्यांना दाखविले |
घडो नये वाटले, तेच घडविले ||

प्रत्येक प्रयत्न, निष्फळ ठरविले |
स्वप्नातही शिरून, सुख नष्ट केले ||

प्रेमाच्या नात्यात, तिरस्कार आणले |
मला माझे म्हणाया, कोणी ना ठेवले ||

कोणी तरी सांगा.....
मी काय पाप केले ?
नीतिने वागूनही.....
अन्याय का झाले ?
जगण्यात या माझ्या.....
मरण का आले ?

1 comment:

Wanna say something ?
I would appreciate your feedback.. :)