मी हे करून दाखवीन |
तू विसरलीस.....
मी पण तुला विसरीन ||
हो, एक दिवस.....
मी पूर्वीसारखं हसीन |
गेलेले ते सर्व.....
पुनः एकदा मिळवीन ||
हो, एक दिवस.....
या धक्क्यातून सावरीन |
तुला समजलो.....
आता स्वतःला समजीन ||
हो, एक दिवस.....
तुला रडताना पाहीन |
जे तूनं केलय.....
ते जगासमोर मांडीन ||
हो, एक दिवस.....
इथे जगायला शिकीन |
असूनी जीवंत.....
प्रिये, तुझ्यासाठी मरीन ||
हो.....
एक दिवस....... ! :(