पाहिले होते मी त्यांना.. त्यांचे विचार, स्वभाव, वर्तन..
किती Over Smart, Self Obsessed, Weird, Criticizing असतात ते..
आज दुनियेतली 75 % पाप त्यांच्यामुळेच घडतात.
सभ्य मुलांना तेच तर बद्नाम करतात.. नाही का ?
मित्र मला म्हणायचे.. "कधितरी प्रेमाशी नजरा नजर होईल..!"
मी म्हणायचो.. "No ways.. Pyar impossible..!"
पण एक दिवस..
'तिला' मी पाहिले.. आणी तिनेही 'मला'..!
आयुष्यात पहिल्यांदाच मी एका मुलीच्या नजरेला पाहत होतो..
तिच्या त्या दृष्टीत काय होते कोणास ठाऊक..?
पण कधी नव्हते तसे हृदय धडधडले.. अंग थरथरले.. श्वास गरगरले.. आग भडभडले..
माझ्या नजरेतली कोणतीही मुलगी अशी केव्हाच नव्हती.. नाही अशी नजर !
तिने मला बदलले..
आता तर सर्व मुलींमध्ये तीच दिसू लागली !
ध्यानी मनी स्वप्नी.. तीच भरली..
स्वतःकडे ओढू लागली..
जगातल्या ईतर मुलींपेक्षा.. ही खरोखर वेगळीच होती..!
आजतागत माझ्या या नजरेत भरून राहिली आहे.. तिची ती..
"नजर"..!